Feeds:
Posts
Comments

Archive for the ‘मराठी कविता’ Category

सहज सांगता आलं तर..
हे सहज सांगता आलं तर……………..!!!
वाटणारी प्रत्येक गोष्ट
शब्दांत मांडता आली तर…
मनातली प्रत्येक भावना
बोलुन दाखवता आली तर…
तुझ्यावर प्रेम आहे,
हे सहज सांगता आलं तर..

तुझ्याशिवाय जगुच शकत नाही,
हे पटवुन देता आलं तर…
तुझी खुप आठवण येते
हे विसरुन जाता अलं तर….

तुझ्या पलिकडे सुध्दा आहे
हे जाणुन घेता आलं तर…
माझं सुध्दा अस्तित्व आहे,
हे समजुन घेता आलं तर…

तु फक्त माझीच आहेस,
हे तुला न सांगता कळलं तर..
तु अशिच जवळ रहा,
हे स्पर्शानं सांगता आलं तर…
तु जवळ नसतेस तेंव्हा,
तुझा स्पर्श जाणता आला तर..
किती बरं होईल,
जर मन वाचता अलं तर…

शब्दांपलिकडलं काहीतरी
नजरेनच जाणता आलं तर…
हे सगळेच “तर” नाहीसे होतील
एकदाच म्हणालीस जर…
“मी सुखी होईन,
जर तु माझाच झालास तर..!”

This entry was posted in Marathi Special..

Advertisements

Read Full Post »

One more nice poem I found from the blog: http://davbindu.wordpress.com

तुला पहिल्या वेळी पाहिल्यावर
पुढे असं काही होईल, कधी वाटल नव्हतं
तू मला भेटण्याआधी खरंतर
प्रेम म्हणजे काय कधी कळलंच नव्हतं…
.
.
गर्दीत एकटा दिवस पुढे ढकलतांना
जीवनात अशी बहार येईल, कधी वाटल नव्हतं
खरंच तुझ्या भेटीनंतर जाणवलं
आजवरचं जगण हे तर जगंणच नव्हतं…
.
.
तुझ्या प्रत्येक गोष्टीत
मी असा गुंतेन, कधी वाटलं नव्हतं
तुझ्या त्या अथांग नजरेत हरवून
कसा तुझाच होत होतो हे समजतच नव्हतं…
.
.
तुझा सहवास, तुझा तो स्पर्श
असं वेड लावेल, कधी वाटलं नव्हतं
तुफ़ान पावसांतही कोरडा राहणारा मी
हलक्या सरीतही कसा भिजत होतो उमगतच नव्हतं…
.
.
व्याकुळ होऊन तुझी वाट पाहतांना
कोणासाठी असा झुरेन, कधी वाटल नव्हतं
आपल्या दुराव्याचा तो एक एक क्षण
असा मरणासारखा छ्ळेल हे खरंतर पटतंच नव्हतं…
.
.
माझ्या जीवनात कोणी अस हळुवार येऊन
माझ जीवनच बनून जाईल, कधी वाटल नव्हतं
अन माझ्या जीवनातील वाळवंटाची अशी बाग होतांना
अचानक मला जाग येईल असंही कधी वाटल नव्हतं…..

-देवेंद्र चुरी

(ही कविता याआधी ऋतु हिरवा या पावसाळी विशेषांकातही प्रसिद्ध झाली आहे.)

Read Full Post »

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं…

आपला दिवस होतो
जेंव्हा जाग आपल्याला येते
आपली रात्र होते जेंव्हा
झोप आपल्याला येते
झोप आली की झोपायचं
जाग आली की उठायचं!

पिठलं भाकरी मजेत खायची
जशी पक्वान्नं पानात
आपल्या घरात असं वावरायचं
जसा सिंह रानात!
आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं
आपणच कौतुक करायचं

असेलही चंद्र मोठा
त्याचं कौतुक क1शाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही
आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून
घरभर शिंपत रहायचं

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं………

Read Full Post »